रायगड लोकधारा वृत्त :
कळंबोली वार्ताहर – अविनाश जाधव : नवी मुंबईकरांना मुंबईत लवकर पोहंचता येणार आहे. लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा यांना जोडणारा एअरपोर्ट एक्स्प्रेस मेट्रो मार्गा चे काम सुरू होण्याची शक्यता आहे. हे अंतर ३५ किमी लांबीचे आहे .ह्या मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे. त्या मुळे दोन शहर हे फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर येणार आहेत. यामुळे उपनगरी रेल्वे सेवेवरील ताणखूप कमी होणार आहे. सायन पनवेल महामागार्तील रस्त्यावरती वाहतूक कोंडी सुद्धा कमी होण्यास मदत होणारआहे. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवी मुंबईचा विकास करण्यात आला. सिडकोने मोठ्या प्रमाणात नवी मुंबई हे शहर उभारले. नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे.
त्याचबरोबर पुष्पक नगर आणि नैना ही शह विकसित होण्याच्या मार्गावर आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलसह नवी मुंबईला एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. मे महिन्यामध्ये आंतरदेशीय विमानसेवा नवी मुंबई ठिकाणाहून सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले आहे. दरम्यान नवी मुंबईमधील वाढती प्रवासी संख्या पाहता सिडकोने विविध टप्प्यात २५ मेट्रो मार्ग प्रस्तावित केले आहेत. त्यापैकी बेलापूर ते पेंधरदरम्यान ११ कि मी लांबीच्या मार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे मेट्रो मार्ग क्रमांक ८ हा ३५ कि मी असून यात २५.६३ कि मीचा उन्नत मार्ग राहणारआहे.
नवी मुंबई विमानतळाला मेट्रो मार्ग जोडणार
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत सध्या पहिल्या टप्प्यातील बेलापूर ते पेंधर (मेट्रो मार्ग क्र.१) मार्गवर नोव्हेंबर २०२३ पासून प्रवास वाहतूक सुरू झाली आहे. मेट्रो चा ह्या मार्गिकेचा पुढील टप्पा बेलापूर येथून हा मार्ग ३.०२ किमीने वाढवून तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्याची योजना आहे.
अशी असेल विमानतळ एक्स्प्रेस लाइन !
मुंबई वि मानतळ ते मानखुर्द अशी ११.१ किमी लांबीची मेट्रो लाइन ८ बांधण्यात येणार आहे. तर, सिडको मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ या मार्गाचा विस्तार करणार आहे. तसेच, हा मार्ग भुयारी (टनेल) असणार आहे. येथील अंधेरी ते घाटकोपर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत हा भुयारी मार्ग
असणार आहे. घाटकोपर ते मानखुर्द हा लिंक रोडने उन्नत मार्ग करण्यात येणार आहे.
नवीमुंबई ते मुंबई हा ३० मिनिटांत अंतर कापता येणार
नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर वाहतुकीच्या समस्येत वाढ होईल. नागरिकांनी वाहतूक कोंडीत अडकून बसू नये म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मार्गामुळं मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर ३० मिनिटांमध्ये कापता येणार आहे. तसेच,या मार्गावर ७ स्थानके असणार आहेत. तसंच,या मार्गावर दर २० ते ३० मिनिटांनी मेट्रो फेऱ्या धावल्या जातील.
