रायगड लोकधारा :
– : हेल्थ टिप्स : –
अविनाश जाधव वार्ताहर : कळंबोली वार्ताहर :-उन्हाळा लागला की बर्फाचा गोळा खाण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात होत असते. पण हा बर्फाचा गोळा आपल्याला आजारी बनवू शकतो. याचे कारण म्हणजे हा जो बर्फाचा गोळा तयार करणारे कारखाने जे आहेत तेथे स्वच्छतेचा अभाव असतो. तसेच रंगीबेरंगी कुल्फी सुद्धा आपल्या शरीराला हानिकारक आहे. तसेच तिथले पाणी सुद्धा अन प्युरिफाय असते. संबंधित विभागाकडून बर्फाचे नमुने सुद्धा तपासले जात नाहीत. संबंधित विभागाने बर्फाच्या कारखान्याची तपासणी करणे गरजेचे आहे. पण याबाबत नेहमीच उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे शहरात खुलेआम दूषित पाण्यापासून बनवलेला बर्फाचा वापर केला जात आहे. या बर्फ गोळ्यामध्ये अनेक रंगीबेरंगी रासायनिक रंग असल्यामुळे त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. तरी हा बर्फ गोळा खाण्यापूर्वी विशेष काळजी घ्यावी. आणि आपल्या मुलांना या पासून दूर ठेवण्याची गरज आहे.
