रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : महाड तालुक्यातील कोझर ग्रामपंचायतचे माजी सरपंच तरुण नेतृत्व सर्वांना सोबत घेऊन चालणारे क्रांती भूमीचे सुपुत्र निलेश देवगिरीकर यांची भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. असल्याचे पत्र रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील यांनी दिल्याचे समजते निलेश देवगिरीकर यांची निवड होताच महाड तालुका भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी देवगिरीकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. निलेश देवगिरीकर यांची महाड तालुका अध्यक्षपदी निवड होताच संपूर्ण रायगड जिल्हामध्ये त्यांचा अभिनंदनचा वर्षा होत आहे.
