रायगड लोकधारा वृत्त :
उरण दि. १७ विठ्ठल ममताबादे : राजकुमार कांबळे हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील भिलकटी , वडलज , निंभोरे गावचे सुपुत्र आहेत. अगदी लहानपणापासूनच नवीन काहीतरी करण्याचा छंद, कष्ट करण्याची तयारी आणि संशोधक वृत्ती याच त्यांच्या स्वभावामुळे आज त्यांना एलीयर इव्हेंजेलिकल युनिव्हर्सिटी ऑफ यु.एस.ए. या विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आलेले आहे. राजकुमार कांबळे यांनी अनेक विविध क्षेत्रात कार्य केले आहे. हे कार्य करत असताना अनेक वेळा यश अपयश येऊन देखील ते खचले नाहीत, तर त्यातून नवीन काहीतरी शिकण्याची त्यांची वृत्ती यामुळेच ते यश मिळू शकले. त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे, परंतु समाज स्वावलंबी बनवायचा असेल तर समाजाची आर्थिक प्रगती झाली पाहिजे हा विचार त्यांना शांत बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांनी शेअर बाजाराचा अभ्यास केला अनेक लोकांना शेअर बाजारचे प्रशिक्षण दिले. त्यातून अनेक लोकांनी प्रगती साध्य केली. परंतु तळागाळाच्या लोकांना स्वावलंबी बनवायचे असेल तर शेती, शेतीपूरक उद्योग, पशुपालन यामध्ये काहीतरी करावे या उद्देशाने त्यांनी अनेक शेतकऱ्यांचा, ग्रामीण भागाचा अभ्यास केला. त्यातून त्यांच्या निदर्शनास आले की, पशुपालन शेळीपालन यामुळे गरिबातील गरीब व्यक्ती आर्थिक परिस्थितीने सक्षम होऊ शकतो, तसेच आज अनेक शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा मनाला फार वेदना होतात म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन ही त्यांनी दाखवून दिले आणि मग त्यांनी यामध्ये संशोधन करून गरिबांना आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवायचा या प्रेरणेने कार्य सुरू केले. त्यांनी आज अनेक शेतकऱ्यांना बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिलेले आहेत. स्वतः ही १०० पेक्षा जास्त शेळी पालनाचा व्यवसाय करीत आहेत. त्यावरून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव असा आहे की शेळी व्यवसाय हा नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. याचीच दखल घेऊन अमेरिकेतील एका विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे. या यशामध्ये त्यांच्या धर्मपत्नी सौ.संयोगिनी आणि चिरंजीव श्री.आशिष यांची प्रत्येक कार्यात फार मोठी मदत होत आहे आणि भक्कम पाठिंबा मिळाला आहे, अशा प्रकारचे महान कार्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श यामुळे हे यश मिळाले, म्हणूनच प्रत्येकाने आपले जीवन जगत असताना अशा महान व्यक्तींचे आदर्श घ्यावेत आणि आपले जीवन सन्मानाने जगावे आणि इतरांना देखील जीवन जगण्यास मदत करावी हेच या कांबळे साहेबांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या यशातून दिसून येते. राजकुमार कांबळे यांना डॉक्टरेट मिळाल्यामुळे संपूर्ण स्तरात त्यांच्यावरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
