१७ मे १९८६ रोजी पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाला. उच्च शिक्षित असलेले, अत्यंत साधेपणाने वागणारे, नम्रतेने वागणारे व दांडगा जनसंपर्क असेलेले तसेच उरण मधील विविध सामाजिक कार्यात सक्रिय असणारे पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा १७ मे रोजी उरण शहरातील विमला तलाव गार्डन मध्ये मॉर्निंग ग्रुप व मित्र परिवार तर्फे गुलाबपुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकार विठ्ठल ममताबादे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला आहे.