रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण दि. १८ ( विठ्ठल ममताबादे ) : उरणकर दर महिन्याच्या १७ तारखेला आनंद घेतो, तो विमला तलावावर होणा-या मधुबन कट्ट्यावर होणा-या कविसंमेलनाचा. येथे विशेष होते तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा जीवनगौरवांचा सन्मान.याच ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) कडून जवळजवळ १५० हून अधिक ज्येष्ठांना सन्मानित करण्यात आले आहे. ते शाखेचे उरणकरांना अभिमान वाटावे असे कार्य आहे, असे उरण उत्कर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी विचार मांडले.
गौरव मूर्ती नाट्यकर्मी कमलाकर घरत यांनी सुचविले की १५० व्या कार्यक्रमात उरणातील सर्व गौरव प्राप्तींचा एक मोठा सोहळा ठेवावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्राम तोगरे यांनी उरणची कोमसाप ही उरणकरांना आनंद देणारी शाखा आहे असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे गोपाळ पाटील यांच्या हस्ते गौरव मूर्तींना सन्मानित करण्यात आले. मच्छिंद्र घरत, भुवनेश पाटील,तानाजी गायकर, जनार्दन म्हात्रे, सुरेश भोईर,अनंत पाटील, रवींद्र सूर्यवंशी,वसंत कुंडल, गावंड आर,सी, अरविंद घरत आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी झालेल्या कविसंमेलनात कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. अनिल भोईर, अजय शिवकर, संजीव पाटील मारूती तांबे, गजानन म्हात्रे, किशोर म्हात्रे, अनामिका राम, नरेश पाटील, बालकवी अनुज शिवकर, रमेश धनावडे, गोपाळ पाटील आदींनी कविता गायले. रायगडभूषण प्रा एल बी पाटील यांनी कवितेनंतर सुमधुर आवाजात आगरी बोलीत पसायदान सादर करून सर्वांना वेगळा आनंद दिला. उपस्थितांचे आभार शिक्षक संजीव पाटील यांनी मानले. एकंदरीत कवी संमेलन मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाले.

