रायगड लोकधारा वृत्तसेवा :
शैक्षणिक वर्ष २०२४- २५ चा दहावी बोर्डाचा निकाल जाहीर
उरण दि. १८ ( विठ्ठल ममताबादे ) : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ चा दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये द्रोणागिरी हायस्कूल उरण,करंजा शाळेचा विदयार्थी कु. यशराज देविदास थळी याने १० वी मध्ये ९१% गुण प्राप्त करून, द्रोणागिरी हायस्कूल करंजा शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा म्हाञे व प्रदीप नाखवा चेअरमन, दोणागिरी हायस्कूल करंजा इंग्रजी माध्यम तथा शाळेय शिक्षण समिती सदस्य यांनी यशराजला शुभेच्छा देऊन त्याचे अभिनंदन केले आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन व प्रशालेच्या प्राचार्या यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. व त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
