रायगड लोकधारा वृत्तसेवा :
वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये
समा
पनवेल प्रतिनिधी : सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत त्यांचे अभिष्टचिंतन केले.
समाजसेवेच्या ध्येयाने प्रेरित होऊन माजी सभागृहनेते प्रेह ठाकूर यांनी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले आहेत. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचा वारसा घेत माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी लोकाभिमुख कार्यातून जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. त्यांचा मनमिळावू हसतमुख स्वभाव, ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेला आदरभाव, आणि युवा पिढीला दिलेले प्रोत्साहन यामुळे त्यांच्याभोवती नेहमीच कार्यकर्त्यांचा मोठा समुदाय दिसून येतो. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे आणि सामाजिक उपक्रम राबवले गेले असून, सामाजिक बांधिलकीतून त्यांची सर्वसामान्य माणसाशी माणुसकीची नाळ जोडली आहे, त्यामुळे पनवेल परिसरात ते एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल महानगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी कार्यक्रमांची मालिका पार पडली. त्यामध्ये खारघर येथे ‘पनवेल लीग’ फुटबॉल स्पर्धा, कळंबोलीत अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, कामोठे येथे भव्य कुस्ती स्पर्धा, पनवेलमध्ये ‘आंबा महोत्सव’, ‘अभंग रिपोस्ट’ आणि ‘वारसा संस्कृतीचा’ या नावाने संगीत, नृत्य व कलेचा संगम असलेला सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाबरोबर विकासकामांचे भूमिपूजन यांचा समावेश होता.हे सर्व उपक्रम समाजाच्या सर्व थरांना स्पर्श करणारे ठरले असून, पनवेलकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वाढदिवसानिमित्त त्यांनी वडील लोकनेते रामशेठ ठाकूर, आई शकुंतला ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. तसेच वाढदिवसानिमित्त भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिष्टचिंतन करून त्यांना निरोगी दीर्घायुष्य व पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.




