रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण दि. २१ ( विठ्ठल ममताबादे ) स्वप्न जर गगनभेदि असतील आणि प्रयत्नांची पराकाष्टा त्या दिशेने होत असेल तर यश हे खूप जवळ असते. एस एस सी बोर्ड परीक्षेत सुविद्या विद्यालय कामोठे येथे शिक्षण घेणाऱ्या नहुष मेघनाथ म्हात्रे याने एस एस सी परीक्षा मध्ये ९१.४० टक्के मिळवून शाळेत तिसरा नंबर पटकावून उरण तालुक्यातील गोवठणे गावाचे नाव रोशन केले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थी हे अतिशय कुशाग्र बुध्दीचे असतात हे नहूष ने सर्वाना दाखवून दिले आहे.सदर या घवघवीत यशाबद्दल नहूष चे सर्वच स्तरावर कौतुक केले जात आहे.गोवठने गावाच्या समस्त नागरीकांनीही नहुषचे कौतुक केले आहे. गोवठणे गावा मध्ये प्रसिद्ध यु ट्यूब कलाकार प्रेमनाथ म्हात्रे, श्रीराम म्हात्रे ,प्रदीप म्हात्रे, यश म्हात्रे ,रचित म्हात्रे,श्रेया म्हात्रे यांनी नहुष म्हात्रे यांचे सत्कार करून त्याचे भरभरभरून कौतुक केले आहे.विविध सामाजिक संस्था संघटनेतर्फेही नहूषचे सत्कार करण्यात आले.यावेळी पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
