रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण दि. २१ ( विठ्ठल ममताबादे ) : प्रीती टूर्स कडून पाच दिवसीय मध्यप्रदेश मधील ओंकारेश्वर, उज्जैन इंदोर ही सहल आनंदात आणि उत्साहात संपन्न झाली.
या सहलीत महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील राजेश्वरी देवी मंदिर, ओंकारेश्वर येथील ओंकारेश्वर, ममलेश्वर, नर्मदा स्नान, उज्जैन येथील सांदीपनी ऋषी आश्रम, कुंडेश्वर महादेव मंदिर, मंगळ ग्रह मंदिर, काळभैरव मंदिर, शनिदेव मंदिर, भृतहरी गुंफा, श्री हनुमान मंदिर, महाकालेश्वर मंदिर, महाराजा विक्रमादित्य मंदिर, हरीसिद्धी माता मंदिर, इंदोर येथील बडा गणेश मंदिर, शीश महाल, अहिल्याबाई होळकर वाडा आणि खजराना गणेश मंदिर पहिले. सर्वजण आरती, भक्तिगीते यात दंग झाले होते. ग्रुपमधील अनेकांनी महाकाल नाव असलेले शर्ट खरेदी करून परिधान केले होते. सर्वांनी प्रसाद, खाऊ, कपडे यांची भरपूर खरेदी केली. सहलीमध्ये चहा, नाश्ता, जेवण अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट होते. सर्वांनी त्याच्यावर यथेच्छ ताव मारला. तसेच ओंकारेश्वर येथील नर्मदा पॅलेस अँड रिसॉर्ट आणि उज्जैन मधील जे के हॉटेल अँड रिसॉर्ट मध्ये राहण्याची उत्तम सोय होती.
या सहलीबद्दल आयोजक प्रीती कडव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आपल्या धर्माची नवीन पिढीला माहिती रहावी म्हणून अनेक धार्मिक स्थळी सहल आयोजित केली जाते असे त्यांनी सांगितले. यापुढील काही सहली धार्मिक ठिकाणाबरोबर ऐतिहासिक ठिकाणी देखील नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सहलीमध्ये गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय, हर हर महादेव अशा उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या जात होत्या. सर्व पर्यटकांनी ट्रिप च्या आयोजक प्रीती टूर्स च्या सर्वोसर्वा प्रीती कडव मॅडम यांना धन्यवाद दिले.
