⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
कांतीलाल पाटील : उरण, दि. २६ : सोमवारी दिनांक २६ मे २०२५ रोजी सकाळी चक्रीवादळ तडाका उरण तालुक्यातील कळमुसारे गावाला बसला असून सुमारे ५० घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच चिरनेर, मोठी जुई, विंधणे, कोप्रोली, सारडे,जासई या गावातील घरांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे. घरांची कौले, पत्रे,छपरे उडून गेल्याने घरात पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे घरातील अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्युत वाहक तारा पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून, मोठ मोठी झाडे उन्नामाळून पडली आहेत. स्थानिक रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी झाली नाही. स्थानिक रहिवासी शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापनाची वाट पाहत दुःखाच्या सावटा खाली व्यथित झाले आहेत.
तरी उरणचे विद्यमान आमदार महेश बालदी साहेब आपण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन, उरण तालुक्यातील नुकसान झालेल्या घरांना शासनामार्फत मदत मिळून द्यावी ही आपणास मी विनंती करत आहे.
