⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
कांतीलाल पाटील : मुंबई,दि.२६ : यंदा १२ दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. लवकरच मुंबईतही मान्सून दाखल होत आहे. जूनमध्ये येणारा मान्सून मे महिन्यातच दाखल झाल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याच्या घटना होतात. तसंच भुयारी मार्गही ठप्प होतात. यामुळे रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे शहराची वाहतूक, रेल्वे व्यवस्था विस्कळीत होऊन शहर ठप्प होते. दररोज लाखोंच्या संख्येनं चाकरमानी मुंबईत प्रवास करतात. पावसामुळे चाकरमान्यांचा खोळंबा होतो.
