⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
अविनाश जाधव प्रतिनिधी : मुंबई मेट्रोचा ठाण्यापर्यंत विस्तार झालेला आहे. आता तो मेट्रोचा विस्तार बदलापूर पर्यंत पोहोचणार. ठाणे शहराच्या पुढे खेडेपाडे शहरीकरणांमध्ये वाढत असल्यामुळे नोकरदार वर्ग हा कामासाठी मुंबईमध्ये येत असतात. त्यामुळे लोकल मधील गर्दी वाढत चालल्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. आता बदलापूरकरांचे लोकल च्या गर्दीतून सुटका होणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 लाईनची निविदा निघाली असून हा मेट्रो मार्ग लवकर चालू होणार आहे. मेट्रो मार्ग लाईन 14 हा 34 किलोमीटर लांबीचा असणार आहे.
मेट्रो लाईन 14 कांजूरमार्ग ते बदलापूर या मार्गीतेची निविदा प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे मुंबई व बदलापूर हे दोन शहर लवकरच मेट्रो ने जोडले जाणार आहे. एम एम आर डी ए कडून या मेट्रो लाईन 14 चे 34 किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका काम लवकरच चालू होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तसेच सार्वजनिक आणि खाजगी मालकीच्या भागीदारी तत्त्वावर खाजगी क्षेत्रातील सहभागाचे नियुक्ती करण्यासाठी ही निविदा प्रसिद्ध केली आहे. मेट्रो लाईन 14 ही पुढील पाच वर्षात पूर्ण करण्याचे आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्च 14 हजार 898 कोटी इतका अपेक्षित आहे. ही मालिका चालू झाल्यानंतर या मार्गे के वरून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी प्रवास करू शकतात. मेट्रो ही खाडी पार करून ही पहिलीच मेट्रो मुंबईमध्ये होत आहे.
या मेट्रो वरती 15 स्थानके असणार आहेत. हे मेट्रो झाल्यामुळे नवी मुंबई ठाणे भिवंडी अशा सर्व कडून मेट्रोला मार्गी का जोडण्यात येणार आहेत.
