रायगड लोकधारा वृत्त :
बदलापूर प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर : बदलापूर मधून 31 वर्षापासून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र उल्हास प्रभात चा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नुकतेच संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे, बदलापूर-अंबरनाथ बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव, सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले, उल्हास प्रभातचे संपादक डॉ. श्री. गुरुनाथ बनोटे यांच्यासह विशेष पुरस्कार विजेते चंद्रकांत खडकबाण, कैलास मनोरे, रवी कुंभार, गजानन टोहके, एड. संतोष मळवीकर, देवेसिंग राजपूत, डॉ. चित्रलेखा माने व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या राज्यभरातील 70 जणांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात आमदार किसन कथोरे यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे कौतुक करत अशी व्यक्तिमत्व समाजासमोर आणण्याचे काम करणाऱ्या उल्हास प्रभात चे संपादक डॉ. गुरुनाथ बनोटे यांचे कौतुक केले.
गेली 12 वर्षापासून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाज रत्न, आरोग्य रत्न, शिक्षण रत्न अशा विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. राज्यभरातून आलेल्या दिवाळी अंकांमधून 13 दिवाळी अंक निवडण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक अवतरण सकाळ मुंबई, द्वितीय क्रमांक उद्याचा मराठवाडा नांदेड, तृतीय क्रमांक अपेक्षा कोथरूड पुणे, सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक फोर्ट ट्रस्ट कामगार मुंबई ,सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक वेदांत श्री पुणे, सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक जमाना धमाका अहमदनगर, रणांगण नवी मुंबई, नृत्यवकाश पुणे, साहित्य सवाना नाशिक, सुभाषित नाशिक , पुरुष स्पंदन मुंबई, अर्थशक्ती मुलुंड यांना उत्कृष्ट व सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश दामोदरे यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना आरती नेरपगार यांनी केले या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत सहसंपादक अतुल नेरपगार गुरुनाथ तिरपनकर, प्रमोद हरपुडे, भावेश चंद्रा आदींनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम पार पडला.
हा सोहळा काटदरे मंगल कार्यालयात पार पडला.
