⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
कृषी विभागाने शेतकऱ्यांना खरिप हंगामात बांधावर जावून मार्गदर्शन करावे….
रायगड प्रतिनिधी – दि. ३० : रायगड जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणावर मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. सद्याची पावसाची आकडेवारी पाहता संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सर्व यंत्रणानी सदैव दक्ष रहावे. सर्व दरड क्षेत्रात येणारी गावे, जुने व धोकादायक पूल व साकाव आणि पाणी साठे यांची सर्व विभागांनी पाहणी करून अहवाल सादर करावा. आवश्यकतेनुसार सर्वांनी कार्यवाही करावी असे निर्देश दिले. यंदा पूल अथवा रस्ता दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा यावेळी दिला.
महाड येथील शासकीय विश्रामगृह जिल्ह्यात निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीचा आढावा, खबरदारी व जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी अध्यक्षतेखाली महाड माणगाव व पोलादपूर विधानसभा क्षेत्र तसेच जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प नेहा भोसले, उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे, जिल्हा शल्य चिकित्सक, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग,NDRF अधिकारी, तहसीलदार , गटविकास अधिकारी, लघु पाटबंधारे, ,वन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , महावितरण कार्यकारी अभियंता यांसह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
आपत्ती निवारण ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगून मंत्री गोगावले म्हणाले की, आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाने नेमून दिलेली जबाबदारी चोख पणे पार पाडावी. तसेच निश्चित कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी. रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने मॅपिंग करणे गरजेचे आहे. मागील घटनांचा विचार करता मॅपिंगमध्ये नसलेल्या ठिकाणीही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावाची पाहणी ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या मार्फत करण्यात यावी.
जी गावे दरडप्रवण क्षेत्रात येतात त्या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात. या गावांची परिपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाकडे संकलित असावी. अचानक आपत्ती उद्भवल्यास तात्काळ मदत कार्य पोहोचविणे शक्य होईल असे यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व शाळा, रुग्णालये, पूल, साकाव, रस्ते यांचे प्राधान्याने स्ट्रक्चरल ऑडिट करावे. जेथे डागडुजी करणे शक्य आहॆ तेथे तात्काळ दुरुस्ती करावी. जेथे दुरुस्ती करणे शक्य नाही तेथे पर्यायी व्यवस्था करावी. यामध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. यंदा अशी कुठलीही दुर्घटना घडल्यास संबंधित विभागास जबाबदार धरले जाईल. तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल मंत्री महोदय यांनी यावेळी स्पष्ट केले.
पावसाळ्याच्या पूर्ण कालावधीत जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सुसज्ज असावी.रुग्णवाहिका वाहन चालकासह सुसज्ज असाव्यात. त्यांची आवश्यक दुरुस्ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी. सर्व प्राथमिक केंद्रात मनुष्यबळ आणि औषधसाठा उपलब्ध ठेवावा. पावसाळ्यात सर्प दंशाच्या मोठया प्रमाणावर दुर्घटना घडतात. त्यासाठीची आवश्यक सर्व औषधे उपलब्ध असावेत असे सांगून या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य मंत्रीस्तरावरून पाठपुरावा करण्यात येईल असेही सांगितले.
जिल्ह्यातील ज्या ठिकाणी दरड कोसळणे किंवा पूर यामुळे संपर्क तुटतो अशा ठिकाणी रेशनचा अधिकचा साठा पुरवण्यात यावा. विद्युत विभागाने त्यांची सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याचे तपासून घ्यावे अशा सूचनाही मंत्री महोदय यांनी केले. जिल्ह्यातील नद्या, तलाव तसेच पारंपरिक पाणवठे यातील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने करा. ज्योयोगे पाणीसाठा वाढेल तसेच जलस्रोत्यांचे संवर्धन होईल. तसेच शहरातील सर्व नाले सफाई येत्या चार दिवसांत पूर्ण करावी असे निर्दश आज देण्यात आले.
खरिप हंगाम पेरण्या अद्यापही झाल्या नाहीत आपत्कालीन व्यवस्थापन तयारी करणे व अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान होते आहॆ. या नुकसानीचे जैसे थे पंचनामे कृषी विभागाने तात्काळ करून जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा ,वन विभागाने जंगलामध्ये वन्य प्राण्यांकरिता फळ झाडे लागवडीकरिता नियोजन करावे असे निर्देश मंत्री महोदय यांनी दिले. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ साहाय्य मिळावे, यासाठी प्रशासनाने संबंधित यंत्रणांचे साहाय्य क्रमांक (हेल्पलाईन नंबर) उपलब्ध करून दिले आहेत. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला संबंधित यंत्रणांचे साहाय्य घेता येईल. जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या सर्व आपत्कालीन सेवांचे संपर्क क्रमांक प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गाव पातळीवर त्याची ठळक पणे प्रसिद्धी करण्याचे निर्देश दिले. शाळा तसेच समाज मंदिरे, सभागृह येथे पण त्याची प्रसिद्धी करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डोंगराळ भागात दरड कोसळून रस्ते बंद होऊ नयेत म्हणून जेसीबी, पोकलॅन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्तीच्या प्रसंगी शासन जनतेच्या पाठीशी असल्याचा विश्वास देण्याबरोबरच आवश्यक ते सर्व मदत कार्य वेळेत करावे असे निर्देश दिले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीची माहिती सादरीकरनाद्वारे दिली.





