⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
जो जो करील तयांचे परंतु अधिष्ठान पाहिजे भगवंताचे ! या विचाराने प्रेरित होऊन तमाम जनतेची सेवा करणारे लोककल्याणकारी नेते, कॅबिनेट मंत्री-महाराष्ट्र राज्य रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास, उपनेते-शिवसेना, नामदार श्री भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले साहेबांना जन्मदिनाच्या अंतकरणापासून मनःपूर्वक शुभेच्छा..! भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले साहेब हे कुटुंबप्रमुख आपल्याच घरातील सदस्य समजून सर्व जाती धर्मातील मतदारांना अशी वागणूक देणाऱ्या या नेतृत्वाच मी सॉल्लीड फॅन आहे, आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे… महाड, पोलादपूर, बिरवाडी, माणगाव, गोरेगाव, निजामपूर इथपासून ते आत्ताच्या अनेक नैसर्गिक किंवा राष्ट्रीय आपत्तीत काही ना काही निमित्ताने, कधी दुरुन तर कधी खुप जवळून आदरणीय नामदार. भरतशेठ गोगावले साहेबांचं काम पाहण्याची संधी मिळाली आणि प्रत्येक वेळी हा विचार डोक्यात आला की लोकांच्या कामासाठी, संकटात मदतीसाठी धाऊन जाण्यासाठी नेतृत्व असाव तर तो असा…
विद्यमान कॅबिनेट मंत्री नामदार श्री भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले साहेब हे सगळं ऐकताना ह्याच्यातला संवेदनशील कार्यकर्ता इतका अस्वस्थ होतो की फोन ठेवल्या- ठेवल्या साहेबांचं वाक्य काय असतं माहिती आहे ? साहेब फोन ठेवल्यावर जवळच्या सहकाऱ्यांना म्हणतात, “ए चला काढा रे गाडी, आपल्याला दुर्घटनास्थळी पोहचायचं आहे”
पुढच्या काही तासात नव्हे तर मिनिटात हे साहेब दुर्घटनास्थळी पोहोचतात आणि सेम टाईम आपल्या लोकांना कसं काय धीर देता येईल काळजी करण्याचं कारण नाही ! या ब्रीद वाक्यप्रमाणे आपलं सर्वस्व पणाला लावतात. कोणती अडचण येऊ नये म्हणून पूर्ण आर्थिक स्वरूपाने मदत करतात. सगळं उपलब्ध करून नागरिकांसाठी. साहेब एवढ्या वरच नाही थांबत कामाला सुरुवात पण करतात. म्हणूनच १९४ महाड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची ह्याबद्दल प्रतिक्रिया असते की,”आम्ही भाग्यवान आहोत” की, नामदार. श्री. भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले साहेबांचं नेतृत्व आम्हाला लाभलं. स्वत:च्या कुटुंबाप्रमणे जपण्याचा संकल्प स्वत:शीच करतात. त्यांची ही भावना उपस्थितांना त्यांच्या डोळ्यातच वाचता येत असते. ज्याप्रमाणे या वेळी साहेबांच्या डोळ्यात काळजी आणि संवेदनशीलता असते त्याचसोबत ह्या आठवणी ऐकताना साहेबांच्या डोळ्यात अंगार असतो. मला नुकतंच हे सगळं जवळून अनुभवता आलं. माणसाकडे नुसती ताकद असून भागत नाही तर खुप मोठं मन आणि संवेदनशीलता लागते इतकं झोकून देऊन काम करायला. पद्मविभुषण बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे एक प्रसिध्द वाक्य आहे, ‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात.’ ह्या प्रमेया नुसार आपल्या कामाने कायमच इतिहास घडत राहो ! अस हे आपलं लाडक नेतृत्व “माणसं जपणारा देव माणूस” म्हणजेच भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले साहेब…आपणांस या जन्मदिनी दीर्घाआयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
( रायगड लोकधारा वृत्तपत्र संपादक : विजय चंद्रकांत गायकर )



