⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
दि. ३१ मे २०२५
मुंबई प्रतिनीधी – श्री.सतिश वि.पाटील : लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवीमुंबई आंतराष्ट्रीय विमान तळाला दि.बा.पाटील साहेब यांचे नाव द्यावे यासाठी अनेक वर्ष साखळी अंदोलन, नवीमुंबई आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला होता.भर पावसात ही जनतेने उत्स्फूर्त असा लाखोनी सहभाग घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.तसेच कृती समिती दिल्लीत ही नावाचा प्रस्ताव सादर करून आले.आजपर्यंत फक्त तोंडी अश्वासनेच मिळत होती .आता मात्र कृती समिती व जनतेने लेखी स्वरूपात दि.बा.पाटील साहेब नावाचा शिक्कामोर्तब करण्यात यावा अशी भुमिका मांडली आहे .तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्याची विनंती आज ठाण्याच्या शासकीय विश्राम गृह येथे जिल्हातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या 15 दिवसात बैठक आयोजित करण्यात आली आहे.राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत तातडीने सर्व पक्षीय कृती समितीची बैठक आयोजित करून दि.बा.पाटील साहेब यांचे नाव नवीमुंबई विमानतळाला जाहीर करावे अशी मागणी करण्यात येणार आहे.लेखी स्वरूपात जाहीर करावे,अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल असा इशारा पत्रकार परिषदेत कृती समितीने दिला.
लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव अंतरराष्ट्रीय विमान तळाला देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या फायलीत अनेक वर्ष धुळ खात असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे.नवीमुंबई विमान वाहतूक सुरू करण्याची तारीख जवळ आली तरी देखील विमानतळाच्या नावाची घोषणा झाली नसल्याने काही काळेबरे असल्याचा संशय भूमिपुत्राने व्यक्त केला.दरम्यान विमानतळाला दि.बा.पाटील साहेब यांचे नाव न दिल्यास एकही विमान उतरू देणार नाही ,असा कडक इशारा भूमिपुत्रांनी व्यक्त केला आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नामकरणाचा निर्णय जाहीर करा अशी मागणी सर्व पक्षीय कृती समितीने केली आहे.
