⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मुंबई प्रतिनीधी : श्री.सतिश वि.पाटील : कालिदास सभागृह, मुलुंड येथे मा.मंत्री, शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘लढा आपल्या मुंबईचा’ अभियानांतर्गत प्रबळ आवाज उठवण्यात आला. सरकारच्या भ्रष्ट धारावी पुनर्वसन व मुलुंड पीएपी प्रकल्पावर ठोस प्रश्न उपस्थित करत, धारावीकरांचं पुनर्वसन धारावीतच व्हावं, विकास अदानीचा नाही तर जनतेचा झाला पाहिजे अशी भूमिका मा.आदित्यजी ठाकरे यांनी स्पष्टपणे मांडली. तथा या लढ्यासंदर्भात व प्रकल्पा संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
ईशान्य मुंबईतील हजारोंच्या संख्येने जनतेने, प्रकल्पग्रस्तांनी या लढ्याला साथ दिली. हा लढा केवळ धारावीकरांचा किंवा मुलुंडकरांकरता नाही तर तो आपला, आपल्या मुंबईचा आहे. आजच्या उपस्थितीने कोणत्याही परिस्थितीत या लढ्यात यश मिळवू असा विश्वास दाखवून दिला.या आधी देखील मोठ्या संख्येत मुलुंड मधून “मुलुंड बचाव” अंदोलन करण्यात आले होते.
उद्धव बाळासाहेब शिवसेना सर्व शिवसैनिक आणि मुलुंडकर नागरिकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला होता.सत्ताधारी सरकार धारावी प्रकल्प व पाप प्रकल्प हा मुलुंडकरांवर लादला जाणार नाही असे फक्त बोलत होते.पण केंद्र सरकारकडून आदाणी समुहास हिरवा कंदील दिला असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अनेक तक्रारी केल्या पण दुर्लक्ष होत आहे. प्रकल्पामुळे अनेक समस्यांना मुलुंड ,भांडूप, कांजूरमार्ग या सर्वांना सामोरे जाव लागणार आहे .आधीच दाटीवाटी त्यात प्रकल्पाची भर पडणार आहे.
