⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण दि. १३ विठ्ठल ममताबादे : मैथिली पाटील ही न्हावा गाव पनवेल येथील रहिवासी असून हालाखीच्या परिस्थितीत तिने शिक्षण घेतलं, दोन वर्षांपूर्वी एअर इंडियात रुजू झाली मात्र अहमदाबाद विमान अपघातात तीचा मृत्यू झाला.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिला भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली. उरण मधील सारडे गावचे प्रसिद्ध चित्रकार कुणाल पाटील यांनी कोळसा, पेन, पेन्सिल, कागद या साहित्याचा वापर करून मैथिलीचे चित्र रेखाटून कुणाल पाटील यांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.मैथिली हिच्या मृत्यूने सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कुणाल पाटील यांनी मैथिली हिचे चित्र रेखाटून भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.या चित्रात कुणाल पाटील यांनी मैथिलीचे हुबेहूब चित्र काढले असून चेहऱ्यावरील हाव भाव उत्तम रित्या रेखाटले आहे.
