⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण दि. १३ विठ्ठल ममताबादे : निसर्गाचा मोठया प्रमाणात होत असलेला ऱ्हास, नष्ट होत असलेली सजीव सृष्टी व धोक्यात आलेले मानवी अस्तित्व या गोष्टी लक्षात घेता पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करण्याच्या हेतूने तसेच समाजात पर्यावरण विषयक जनजागृती व्हावे या दृष्टीकोणातून करळ ग्रामपंचायतचे उपसरपंच जितेंद्र घरत यांनी पुढाकार घेत सावरखार येथील खेळाच्या मैदानात नारळ, बदाम आदी वृक्ष लावून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला आहे .जितेंद्र घरत हे दरवर्षी विविध उपक्रम राबवून समाजात जनजागृती करीत असतात. वृक्षारोपण करून त्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश सर्वांना दिला आहे. या उपक्रम प्रसंगी करळ ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अनिता तांडेल, ग्रामपंचायत सदस्य – रिंकू घरत, तेजश्री कडू, सावरखार ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष ओमकार घरत, सावरखार गावातील क्रिकेट खेळणारे खेळाडू, ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.
