🔴 रायगड लोकधारा वृत्त :
रायगड लोकधारा प्रतिनिधी : खालापूर तालुक्यातील नावंडे गावातील कार्यकर्त्यांचा गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षात मोठ्या उत्साहात प्रवेश समारंभ पार पडला. हा पक्षप्रवेश सोहळा कर्जत येथील बाळासाहेब भवन या पक्ष कार्यालयात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करीत पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. या कार्यक्रमात गावातील नागरिक आणि पक्षाचे नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या प्रवेश सोहळ्यात शिवाजी गजानन हडप यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण वामन हडप, मोतीराम वामन हडप, दत्तात्रय हडप, नेताजी हडप, भास्कर हडप, योगेश हडप, गुरुनाथ हडप, योगेंद्र हडप, अंकुश हडप, निवृत्ती हडप, विजय हडप, विजय खडक, जितेश हडप, कैलास हडप, उपसरपंच श्रीकांत हरिश्चंद्र हडप, संजय हडप, पंडित हडप, तेजस बळीराम हडप, रितेश हडप, ओमकार हडप, तानाजी हडप, प्रकाश हडप, अरुण हडप, दिलीप हडप, अभिषेक हडप, स्वप्नील हडप, सागर हडप, राकेश हडप, प्रथमेश हडप, अक्षय हडप, संकेत हडप आणि विकास हडप यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
याचबरोबर महिलांनीही मोठ्या संख्येने शिवसेनेवरील विश्वास व्यक्त केला. सुवर्ण हडप, हिराबाई हडप, सुमन हडप, सुरेखा हडप, भारती हडप, संगीता हडप, योगिता हडप, प्राची हडप, अक्षिता हडप आणि सरिता हडप यांनी पक्षप्रवेश करून गावाच्या एकात्मतेचा आणि शिवसेनेच्या जनाधाराचा प्रत्यय उपस्थितांना दिला.
या प्रसंगी बोलताना , नावंडे गावातील हा भव्य पक्ष प्रवेश हा शिवसेनेच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावा आहे. पक्षात जुने-नवे असा भेदभाव नसून सर्वांना समान सन्मानाने काम करण्याची संधी दिली जात आहे. सामाजिक एकता आणि विकासाच्या वाटचालीत नावंडे गावाला प्राधान्याने स्थान मिळेल, आगामी काळात विकासाचे अनेक प्रकल्प गावात राबवले जातील असे आश्वासन त्यांनी दिले. पुढील होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय एकजुटीने लढणार असून कार्यकर्त्यांनी संघटनेची ताकद वाढवण्यासाठी वचनबद्ध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या सोहळ्याला ज्येष्ठ नेते भाई शिंदे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील, ग्रामपंचायत प्रमुख महेश आगिवले, विठ्ठल राऊत, शाखाप्रमुख समीर हडप, प्रकाश हडप आणि कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उत्साहात पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे नावंडे गावात शिवसेनेचा जनाधार मोठ्या वेगाने वाढत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. गावातील नागरिकांनीही नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना आगामी राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत प्रमुख महेश आगिवले, विठ्ठल राऊत, शाखाप्रमुख समीर हडप, प्रकाश हडप आणि कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उत्साहात पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे नावंडे गावात शिवसेनेचा जनाधार मोठ्या वेगाने वाढत असल्याचे चित्र स्पष्टuपणे दिसत आहे. गावातील नागरिकांनीही नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना आगामी राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
