🔴 रायगड लोकधारा वृत्त :
प्रभागातील नगरसेवकांनी १५ वर्षात केलेली १५ विकासकामे दाखवा : सिध्देश पाटेकर
जगतापांनी उमेदवारी देण्याचा शब्द फिरवला ! पुजा गोविलकर
महाड प्रतिनिधी : महाड नगर परिषदेची सत्ता नसताना शिवसेनेच्या माध्यमातून महाड शहरात ३५० कोटीची विकास कामे आणली. महाडची जनता व व्यापारी यांना पूरापासून दिलासा दिला. त्यामुळे महाड वासियांनी शिवसेनेने शहरात विकास केला असेल आणि शहराचा कायापालट करायचा असेल तर शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि २० नगरसेवक यांना भरघोस मतांनी निवडून देत पालिकेची एकहाती सत्ता द्या असे आवाहन महाड नगर परिषद निवडणुक प्रचाराचा शुभारंभ करताना केला.
महाड शहरातील प्रभाग क्र. ७ मधील शिवसेना उमेदवार सिध्देश पाटेकर व पुजा रोहीत गोविलकर यांच्या प्रचारार्थ दस्तुरी नाका येथे कॉर्नर सभा व रोहीत गोविलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच सभेत शिवसेनेच्या महाड नगर परिषद निवडणुक प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाड शहरातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आजी-माजी नगरसेवक महिला संघटिका इत्यादी उपस्थित होते.
यावेळी आपल्या प्रयत्नातून महाडचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासनाकडून पोलिस मानवंदना सुरु केली. मंत्री नसताना महाड शहरासाठी आपण ३५० कोटीचा निधी आणला. महाड शहरातील जनतेला व व्यापारी वर्गाला महापुरापासून दिलासा मिळावा यासाठी गेली २ वर्ष ३१ कोटीचा निधी आणून सावित्री व काळ नदीतील गाळ काढला.
या वर्षीही गाळ काढण्यासाठी २० कोटीचा निधी मंजूर झाला मात्र पाऊस लवकर सुरु झाल्याने काम अपुर्ण राहीले. येणाऱ्या काळात गाळ काढण्याचे योग्य नियोजन करून सावित्री नदी पात्रातील दोन जुट्टे काढून महाड ला कायमचे पूर मुक्त करण्याचा आपला प्रयत्न असेल असे अभिवचन दिले. येणाऱ्या काळात चवदार तळयाचे सुशोभिकरण, शाहू महाराज सभागृह, दादली पुल व गांधारी पुल, भाजी मंडईची इमारत, छ. शिवाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण, पार्किंग व शॉपिंग सेंटरची इमारत, महाडला ६५ कोटीची पाणी पुरवठा योजनेव्दारे मुबलक पाणी, महाड शहराच्या बाजुने सावित्री नदी किनारी १२५ कोटीची गॅबरिंग वॉल अशी विकास कामे करून महाड शहराचा काया पालट करण्याचा आपला प्रयत्न असेल अशी ग्वाही दिली.
