🔴 रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : महाड मधिल नथूशेठ पार्टे आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय मेहता यांनी समर्थकांसह केला शिवसेना पक्षात प्रवेश…
महाड नगरपरिषद च्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे अशातच कायम महाड नगरपालीकेच्या निवडणूकीत जगताप कुठूंबा सोबत राहणारे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांची साथ सोडत शिवसेना करत असलेल्या विकासकामांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात दाखल होत आहेत. गेली कित्तेक वर्ष जगताप कुठूंबा सोबत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले सहकारी आता त्यांची साथ सोडून धनुष्यबान हातात घेऊन शिवसेना पक्षात दाखल होत आहेत.
आज दिनांक १४ नोहेंबर रोजी महाड मधील नथूशेठ पार्टे यांनी आपल्या परिवार आणि सहकार्यांसह तसेच महाड मधिल सुप्रसिद्ध व्यापारी संजय मेहता, समिर सावंत, समीर देसाई आणि योगेश पाटील यांनी शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला आहे,
यावेळी महाड शहरातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपसस्थित होते.
