🔴 रायगड लोकधारा वृत्त :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / उलवे, ता. २४ : उरण मोरा जेटीवरून रविवारी तीन लॉंचमधून रोमांचक सागरी सफरीला सुरुवात… कोळी समाजाच्या पेहरावात, ओंकार स्वरूपा अभंगाच्या स्वरांत, गायक नाना गडकरींच्या सुरेल गायनात आणि महेंद्रशेठ घरत यांच्या स्फूर्तीदायी नेतृत्वात २०० सहकाऱ्यांनी १७ व्या शतकातील ऐतिहासिक खांदेरी–उंदेरी जलदुर्गाचा आनंद लुटला.
ब्रास बॅडच्या तालावर, गुळाल उधळत नाचत वेताळेश्वराच्या पूजेनंतर महेंद्रशेठ यांनी सर्वांच्या आनंदासाठी, आरोग्यासाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी गाऱ्हाणे मांडले.
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे ५० डॉक्टर्स या मोहीमेत सहभागी झाले.

दुर्ग स्वच्छता, पर्यटन, संस्कृती आणि मैत्रीचा अद्भुत संगम – सर्वांसाठी अविस्मरणीय क्षण !
महेंद्रशेठ घरत म्हणाले : “सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, हीच माझी भूमिका. पर्यटनाची ही परंपरा कायम पुढे नेऊ!”
🟣 प्राध्यापक प्रमोद कोळी यांचा वाढदिवस साजरा करून जल्लोषात कार्यक्रमाची सांगता!

