🔴 रायगड लोकधारा वृत्त :
रायगड प्रतिनिधी : कंपनीच्या csr निधीतून 60 बेंचेस ची अमूल्य भेट.चंद्रकांत सावंत यांच्या प्रयत्नातून सावित्री विद्यालयाला एकूण साठ बेंचेस.माजी विद्यार्थी विपुल घनश्याम सावंत यांच्या प्रयत्नातून 60 बेंचेस.अरकेमा केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही एक अग्रगण्य स्पेशालिटी केमिकल्स आणि प्रगत सामग्री उत्पादक कंपनी आहे,जी शाश्वत विकास, नवकल्पना आणि सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमांसाठी कटिबद्ध आहे.आपल्या CSR

कार्यक्रमांतर्गत,कंपनी शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि समाजसक्षमीकरणावर भर देते.या कंपनीचे HR आजीमजी यांनी सावित्री विद्यालयाला कंपनीच्या CSR निधीतून ६० बेंचेस भेट स्वरूपात दिल्या आहेत.या शैक्षणिक मदतीसाठी सावित्री शाळेचे माजी विद्यार्थी विपुल घनश्याम सावंत यांनी कंपनीचे HR आजीमाजी यांच्याकडे शिफारस केली होती. आजीमजी यांनी शाळेची परिस्थिती पाहून तूर्तास मदत करण्याचे निर्णय घेतले आणि आंबेत गावातील ज्येष्ठ नागरिक शिक्षण प्रेमी चंद्रकात सावंत यांनी यासाठी घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरली आहे.त्यामुळे आज आंबेत सावित्री शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अक्रम झटाम,मुख्याध्यापक सुजित भोसले,शिक्षक अयाज सर,नाजीम सर,आसिफ चिलवान,म्हात्रे मॅडम,इतर शिक्षक वृंद विद्यार्थी कर्मचारी व पालकांच्या वतीने अरेकमा कंपनीचे,तसेच माजी विद्यार्थी विपुल सावंत,व चंद्रकात सावंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
