🔴 रायगड लोकधारा वृत्त :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / उलवे : शेलघर येथील जोमा नारायण घरत सभागृहात झालेल्या ख्रिस्ती समाजाच्या एकता मेळाव्यात आंतरराष्ट्रीय कामगार नेते व कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सर्व धर्म आणि धर्मग्रंथ माणुसकीचाच संदेश देतात, असे सांगत समाजात प्रेम, सौहार्द आणि आदराचे मूल्य जपण्याचे आवाहन केले.

विविध देशांत प्रवास, कैलास मानसरोवर यात्रा आणि सर्व धर्मस्थळांना दिलेल्या भेटींचा उल्लेख करत त्यांनी सर्वधर्म समभावाचा वारसा पुढे नेण्याची ग्वाही दिली. एकता मेळाव्यासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल ख्रिस्ती समाजाने त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमास मिलिंद पाडगावकर, राजेंद्र पाटील तसेच उलवे ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
