रायगड लोकधारा वृत्त :
उरण प्रतिनिधी : उलवे सेक्टर 25A परिसरात 22 वर्षीय कुमकुम बलविंदर कौर या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तिने आपल्या मित्र संदीप याला पाठवलेल्या व्हॉईस नोटमध्ये शेजारीण अंजली शर्मा हिच्यामुळे ती मानसिकरित्या त्रस्त असल्याचा उल्लेख असल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. या ऑडिओनंतर कुटुंबीय पंजाबहून नवी मुंबईत दाखल झाले असून याबाबत उलवे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
तक्रारीत कुमकुमचा भाऊ गौरव बलविंदर कुमार यांनी गेल्या काही महिन्यांपासून अंजली शर्मा सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी अंजली शर्माला ताब्यात घेतले असून घटनास्थळी पंचनामा करून आत्महत्येसाठी वापरला गेला असावा असा प्राथमिक अंदाज असलेला राखाडी-पांढरा स्कार्फ जप्त करून फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला आहे. कुमकुमचा मोबाईल फोन, कॉल डिटेल्स, संदेश आणि समाजमाध्यमावरील संभाषणांचे बारकाईने विश्लेषण करण्यात येत आहे तसेच शेजाऱ्यांचे जबाबही नोंदवले जात आहेत.
या घटनेमुळे उलवे परिसरात खळबळ उडाली असून महिला सुरक्षितता, मानसिक त्रास आणि शेजारी वाद यांसारख्या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांनी संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून फॉरेन्सिक व इलेक्ट्रॉनिक पुरावे प्राप्त झाल्यानंतर सत्य लवकरच समोर येईल, अशी माहिती
