🔴 रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष महाड नगरपालिका निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज सकाळी भाजप निवडणूक कार्यालयाला भेट देऊन, भाजप उमेदवारांना मार्गदर्शन केले. तसेच यादरम्यान प्रभाग क्रमांक ७,८ व ९ मधील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.

महाड नगरपालिका निवडणूक २०२५ मध्ये भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली असून या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा महाड नगरपालिका निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर हे आज महाड येथे आले होते. यादरम्यान त्यांनी चौदातळे येथील भाजप निवडणूक कार्याला सदिच्छा भेट देऊन, उमेदवारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की निवडणूक ही केवळ एक प्रक्रिया आहे या निवडणुकीनंतर नगरपालिकेच्या प्रशासनामध्ये काम करीत असताना निवडून आलेल्या भाजपच्या प्रत्येक नगरसेवकांनी शहरांमध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष कसा वाढेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न कराववे तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्या व शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे असे सांगितले. याप्रसंगी भाजपाचे परिषद सदस्य बिपीन महामुणकर, राष्ट्रवादी चे हनुमंत जगताप, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस डॉक्टर मंजुषा कुद्रीमोती, महाड दक्षिण मंडल अध्यक्ष निलेश तळवलकर, तसेच भाजपा उमेदवार सुरज बामणे, सुमित पवार, श्रद्धा जोशी, सुनील सोंडकर, संकेत पोरे यांच्यासह युतीच्या उमेदवार अक्षय यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक सहा प्रभात कॉलनी तसेच क्रमांक सात व आठ येथिल उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन भविष्यातील महाड शहराची भाजपाची विकास रचना समजावून सांगून भाजपा युतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
