🔴 रायगड लोकधारा वृत्त :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / रोहा : रायगड जिल्ह्यातील रोहा येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोड शो मध्ये सहभागी होत शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला. रोहा नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा धोत्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.

या रोड शोला रोहावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील विविध भागांत उत्स्फूर्तपणे आमचे स्वागत करण्यात आले. या रोड शोमुळे संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे चित्र दिसत होते. मोठ्या प्रमाणावर झालेल्या घोषणाबाजीमुळे वातावरणात उत्साह संचारला होता. “रोह्यात बदल हवा… विकास हवा…” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले होते.
रोह्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे नमूद करत, रोह्याला विकास हवा आहे, अडथळे नाहीत असे याप्रसंगी निक्षून सांगितले. जेवढा निधी लागेल तेवढा आम्ही देऊ. रस्ते, शुद्ध पाणी, भुयारी गटार, रुग्णालय सुविधा, कुंडलिका नदी स्वच्छता आणि पायाभूत सुविधा उभारणी या विकासकामांना गती देऊ अशी ग्वाही याप्रसंगी दिली. आतापर्यंत रोह्यासाठी भरघोस निधी देण्यात आला असून पुढील काळात आणखी भरीव कामे करू असा निर्धार यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, महायुतीचे स्थानिक नेते, पदाधिकारी, महिला संघटना, युवक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
