🔴 रायगड लोकधारा वृत्त :
मुंबई प्रतिनिधी / सतीश पाटील : उरण परिसरातील रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उरण बोरी येथे इयत्ता आठवी या वर्गात शिकणारी 13 वर्षीय विद्यार्थिनी कुमारी प्रियांशी मयूर पाटील केगाव दांडा (उरण) ही एक उत्तम जलतरूण पट्टू असून Maharashtra yachting Association कडून खेळणारी विंडसर्फर देखील आहे.तिने पुन्हा एकदा भारताचे प्रतिनिधित्व करत 25 ते 30 नोव्हेंबर 2025 रोजी थायलंड मध्ये झालेल्या एशियन चॅम्पियनशिप विंडसर्फिंग स्पर्धेत Techno293 (U15 girls)या विभागात रौप्य पदक पटकावले आहे.आशियातील विविध देशांतील खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा चालू असताना प्रियांशी ला दुखापत होऊन सुद्धा आपल्या प्रियांशीने दमदार प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिद्द व कौशल्य दाखवत स्पर्धा पुर्ण केली.
