पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केल्याची बाब रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील माडप कातकरवाडी येथे समोर आली आहे.
खालापूर पोलिसांनी केले आरोपीस जेरबंद (प्रतिकात्मक छायाचित्र)
रायगड लोकधारा विशेष प्रतिनिधी : अलिबाग प्रतिनिधी : पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केल्याची बाब रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील माडप कातकरवाडी येथे समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलीसांनी जेरबंद केले आहे. सुमित काशिनाथ कातकरी असे अटक करण्यात आलेल्या २२ वर्षीय तरूणाचे नाव आहे.
