रायगड लोकधारा न्यूज :

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Dance Bar In Maval | मावळ तालुक्यातील दोन ऑकेस्ट्रा बारवर (Orchestra Bars In Maval) लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक (IPS Satyasai Kartik) यांनी कारवाई केली असताना त्यातील एका रेस्टॉरंट अॅन्ड बारमध्ये चक्क डान्स बार सुरु असल्याचा एका वकिलांनी आरोप केला आहे. इतकेच नाही तर आपण त्याचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यातील एकाने आपल्यावर गोळीबार केल्याचे या वकिलाने ग्रामीण पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत लोणावळा विभागाचे (Lonavala Division) सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले की, याबाबतची तक्रार नुकतीच मिळाली असून आपण त्याची चौकशी करुन आवश्यक ती कारवाई करत आहोत.
