रायगड लोकधारा न्यूज :
उरण तालुका हादरला; बनावट कागदपत्रे, निधीचा गैरवापर आणि नियमबाह्य खर्चाचा सपाटा; पोलिसांत गुन्हा दाखल
उरण, डॉ. मुनीर तांबोळी : केगाव,चाणजे आणि बांधपाडा या तीन ग्रामपंचायतींचा कारभार पाहणाऱ्या वैभव बाळकृष्ण पाटील (वय ३८,) रा.रावे, ता. पेण) या ग्रामविकास अधिकाऱ्यावर तब्बल २० लाख ४६ हजार १५१ रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे उरण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे, याची प्रचीती आली आहे. उरण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी समीर वठारकर यांनी यासंदर्भात उरण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. फिर्यादीनुसार, वैभव पाटील याने २२ जानेवारी २०१९ ते २६ एप्रिल २०२३ या कालावधीत ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेक आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये प्रामुख्याने बनावट कागदपत्रे तयार करणे,निधीचा परस्पर अपहार करणे,ग्रामनिधी आणि पाणीपुरवठा निधीचा बँकेत भरणा न करता परस्पर नियमबाह्य खर्च करणे अशा गंभीर बाबींचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर, ओएनजीसी कंपनीकडून ग्रामपंचायतीला मिळालेल्या लोखंडी पाईपचा लिलाव करून आलेली ३ लाख ९७ हजार ८९९ रुपयांची रक्कम तब्बल १८ महिन्यांनी विलंबाने बँकेत ठेवण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे उघडउघड जनतेच्या पैशाची लूट कारवाईची मागणी होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव पाटील हा आधीपासूनच वादग्रस्त अधिकारी भरणा केल्याचा आरोपही पाटीलवर असून, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर म्हणून ओळखला जात होता.त्याच्याविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. कार्यालयीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटनाही त्याच्या वादग्रस्त कारकिर्दीची साक्ष देणारी आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली,परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या परवानगीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उरण पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून,या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेत आहेत.या घटनेमुळे ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,पारदर्शक कारभाराची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करून जनतेला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता प्रशासनावर आहे.
