रायगड लोकधारा न्यूज :

प्रतिनिधी : श्री.सतिश वि.पाटील :- वाडा, ,डाकिवली गाव
श्री संतोषी माता मंदीर ट्रस्ट मुलुंड,मुंबई यांच्या सौजन्याने गरजवंताला महीलांना साडी,खण 300 वाटप तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य, गोष्टीची पुस्तके 200 वाटप करण्यात आली .डाकीवली जिल्हा परिषद शाळा जि.पालघर शाळेपासूनच संच देण्यात आला.

यावेळी श्री.संतोष माता ट्रस्ट मुलुंड मुंबई चे अध्यक्ष व कार्यकर्ता उपस्थित होते.या कार्यक्रमाची कल्पना श्री.पंडित पवार यांची होती आपण ज्या गाव व शाळेत शिक्षण घेतले त्या प्रती कृतज्ञ व्यक्त करण्याची संधी मिळाली असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच पाहुणे म्हणून श्री.सतिश वि.पाटील पत्रकार हे उपस्थित होते.गावातील सर्व मान्यवर व शाळेतील शिक्षक उपस्थित होते सर्वांच्या हस्ते साडी,खण व शालेय साहित्य वाटप करण्याचा मान देण्यात आला .


