रायगड लोकधारा न्यूज :

चेंबूर मुंबई : मुंबईच्या चेंबुरू भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. रहिवासी सोसाटीच्या परिसरात अर्धवट सुरू असलेल्या मेट्रोच्या बांधकामातील एक खांब कोसळला आहे. त्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला. सध्या अनेक भागात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात अडचण होते आहे. परंतु आता अशाप्रकारे अचानकच ही घटना घडल्याने सर्वत्र काळजीचे वातावरण आहे. नक्की काय घडलं, हे सविस्तर जाणून घेऊयात.
