रायगड लोकधरा न्यूज :
तीसऱ्या नॅशनल तायक्वांडो चॅम्पियनशिप २०२५ मध्ये वॉरियर्स तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंची बाजी.
कर्जत : १ व २ फेब्रुवारी रोजी पुणे रामचंद्र सभागृह येथे ३ री नॅशनल तायक्वांडो प्रतियोगिता पार पडली , या चॅम्पियनशिप मध्ये ६ राज्यातील एकूण 2350खेळाडूंनी सहभाग नोंदविला ,यामध्ये प्रमुख पाहुणे ग्रँड मास्टर अभय सिंग राठोड , ग्रँड मास्टर चंद्रकांत भोसले ,आणी ईतर मान्यवर उपस्थित होते सर्धेचे सर्वेसर्वा मास्टर रवींद्र भंडारी यांच्या सानिध्यात पार पडले, कर्जतच्या वॉरियर्स तायक्वांडो अकादमीच्या मास्टर सौरभ सुनील नवले यांच्या मार्गदर्शनाखाली , पूजा कदम (सुवर्ण पदक ) ,काव्या सपकाळ (सुवर्ण पदक) , क्रिशिता ठक्कर (सुवर्ण पदक) , काव्या पवार (सुवर्ण पदक) , शीवांश घोडके (रौप्य पदक) , श्रवण मरले (सुवर्ण पदक ) ,स्वराज जाधव (सुवर्ण पदक ) ,सतीश मंडला (सुवर्ण पदक) पटकावले व बेस्ट टीम ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले ,तसेच यांची कोरिया येथे होणाऱ्या चॅम्पियनशिप साठी शिष्वृती देऊन आंतरराष्ट्रीय ट्रेनिग कॅम्प व चॅम्पियनशिप साठी निवड करण्यात आली आहे.
