रायगड लोकधारा न्यूज :
ठाणे : ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. फार्महाऊसवर नेऊन केला बलात्कार
ही घटना 28 जानेवारी रोजी बदलापूर परिसरात घडली. एका 19 वर्षीय आरोपीने पीडितेला बारवी धरणाजवळील एका फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे, असे बदलापूर (पश्चिम) पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले. पीडितेने आईला दिली घटनेची माहिती पीडितेने तिच्यासोबत झालेल्या प्रकाराची आपबिती अंगणवाडी शिक्षिका असलेल्या तिच्या आईला घटनेची माहिती दिली. यावेळी आईच्या पाया खालची जमीनच सरकरली. आरोपीला अटक
मंगळवारी मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आणि भारतीय न्याय संहिताच्या कलम 64 (बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
तक्रार दाखल करण्यास विलंब का झाला, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
