रायगड लोकधारा वृत्त :
पुणे प्रतिनिधी : जागतिक महिला दिनीच पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. पुण्याहून बीडला येणाऱ्या महिलेला पाटोदा येथेच बसमधून उतरवण्यात आले. यानंतर ही महिला पाटोदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. त्याच दरम्यान ती अमलदार उद्धव गडकरीच्या संपर्कात आली. त्यांच्यात फोन नंबरची देवाणघेवाण झाली. संधीचा फायदा घेत आरोपीने महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले. स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. पण खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत बलात्कार केला.
