रायगड लोकधारा वृत्त :
कळंबोली प्रतिनिधी : दोन वर्षांपूर्वी दोन वर्षांपूर्वी सिडको गार्डन रोडपाली सेक्टर २०येथे डॉ. प्रभा वाडकर यांनी शोभा सावळकर व इतर चार जणी मिळून गार्डनमध्ये योग प्राणायाम सुरु केला या ग्रुप मध्ये 60 हुन अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. या योग ग्रुप च्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत आम्ही मैत्रिणी योग ग्रुप व महिला पतंजली योग समिती पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने चाळिशीनंतर महिलांनी आपले आरोग्य कसे सांभाळावे ” या विषयावर डॉ सागर सूर्यवंशी यांचे व्याख्यान आयोजित केले होते.त्यामध्ये आनंदी आणि तणावमुक्त जगण्यासाठी आपल्या आरोग्याची आपणच काळजी घ्यावी. बदलत्या जीवनशैलीत मोसमी फळे , पालेभाज्या युक्त सकस आहार, व्यायाम, सकारात्मक असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. “कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला पतंजली योग समितीच्या राज्य प्रभारी सुनिता नानोटे होत्या.
यावेळी ऍड सुवर्णा यादव यांनी ,” महिलांनी अत्याचार सहन न करता कायद्याची निर्भयपणे मदत घ्यावी.कायदे स्त्रियांच्या बाजूने असून वेळीच गुन्ह्यांची नोंद झाल्यास न्याय मिळणे सुलभ होते . आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत सल्ला व मदत मिळू शकते असे सांगत वारसा हक्क, कौटुंबिक हिंसाचार , सायबर गुन्हे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोपात सुनिता जी नानोटे यांनी भारतीय परंपरेचे महत्व विशद केले.महिला पतंजली योग समिती पनवेलच्या जिल्हा प्रमुख छायाजी जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शोभा सावळकर , उर्मिला पाटील, प्रमिला वैदीकर,बारकाबाई यांनी केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, पाहुण्यांचा परिचय, आभारप्रदर्शन डॉ. प्रभा वाडकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत योग शिक्षिका मीना अग्रवाल व मंगल ,सुजाता , साखरे ,राजश्री , वर्षा,रेणू ,आशा यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला .
या वेळी आदर्श महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात, मां जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी यांच्या भूमिका छोट्या मुलींनी साकारल्या .कु. श्रेया वाडकर ( मां जिजाऊ ),कु.आशी ( अहिल्याबाई),कु .जिया वानखडे ( सावित्रीबाई ) ,कु.जिया नायकरे यांनी या भूमिका साकारल्या
