रायगड लोकधारा वृत्तसेवा :
अविनाश जाधव प्रतिनिधी / कळंबोली : कळंबोली येथील सेक्टर टेन इ व सेक्टर 12 मध्ये पाण्याची टंचाई. कळंबोली डी मार्ट त्याच्यापुढे रोडपाली सेक्टर टेन इ प्लॉट नंबर वन ए बी सी डी इ एफ येथे गेली आठ दिवसांपासून पाणी येत नाहीये त्यामुळे येथे रहिवासी नागरिकांनी. थेट जाऊन सिडको अधिकारी यांची माहिती दिली आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी मागणी केली. सेक्टर 10 ई व सेक्टर 12 येथील पाणीपुरवठ्याची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. नागरिकांना मूलभूत गरजांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. असाच प्रॉब्लेम गेली तीन महिने पहिले झाला होता त्यावर ती त्यांनी प्रेशर नि पाणी सप्लाय केला होता सध्या पाण्याचा पुरवठा सध्या कमी दाबाने होत असल्यामुळे पाणी येत नाही परंतु या सेक्टरटेनही मधील नागरिकांचे मान्य आहे की ह्या कळंबोली एरियामध्ये पाणी येतच नाही तरी यावरती कायमचा तोडगा काढावा असे सिडको अधिकारी चर्चा करून त्यांना सांगण्यात आले. येशील का प्रशासनाने पाणी प्रश्नाच गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घ्यावी.

या गंभीर परिस्थितीवर तोच निर्णय घ्यावा असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ठाम व गंभीर भूमिका घेतली आहे. विभाग प्रमुख श्री. महेश गुरव व उपविभाग प्रमुख श्री. तुषार निढाळकर यांनी सिडको येथील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन नागरिकांच्या वतीने लेखी निवेदन सादर केले. तसेच पाणीपुरवठा अभियंता श्री. देवरे साहेब यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती देऊन तातडीने उपाययोजना व पुढील कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या हक्कांसाठी शिवसेना सदैव रस्त्यावर व प्रशासनाशी लढत राहील.
