Oplus_131072
🔴 रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : कळंबोली येथील वाहतूकदार नेते, शिवसेना जिल्हाध्यक्ष आणि सकल मराठा समाज कळंबोलीचे अध्यक्ष रामदास शेवाळे यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘मराठा भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. खांदा कॉलनी, पनवेल येथे झालेल्या सकल मराठा समाज मंडळाच्या पाचव्या वर्धापनदिन सोहळ्यात हा सन्मान सोहळा पार पडला. या वेळी रायगड व नवी मुंबई परिसरातील शेकडो कार्यकर्ते, मराठा बांधव आणि मान्यवर उपस्थित होते. मराठा समाजाच्या हक्कांसाठी सामाजिक आणि राजकीय पातळीवर लढा देणारे रामदास शेवाळे हे नाव गेल्या काही वर्षांत समाजामध्ये प्रेरणादायी ठरले आहे. सकल मराठा समाजाचा मोर्चा असो वा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मिळालेले समर्थन, शेवाळे नेहमी अग्रभागी राहिले आहेत. त्यांनी मराठा समाजातील गरजू कुटुंबे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न आणि बेरोजगार युवकांच्या मार्गदर्शनासाठी सतत प्रयत्न केले आहेत.


