रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : महाडमध्ये आज ‘आशा दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियान, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती महाड आणि MOC कॅन्सर केअर व रिसर्च सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाड येथील विरेश्वर मंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आशा सेविका, वैद्यकीय अधिकारी, तसेच MOC कॅन्सर केअर व रिसर्च सेंटर मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
या कार्यक्रमात तालुक्यातील आरोग्य सेवक आणि आशा सेविकांचा सन्मान करण्यात आला. तसेच, MOC कॅन्सर केअर व रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी कॅन्सर प्रतिबंध आणि आरोग्य जागरूकता याविषयी मार्गदर्शन केले. आशा सेविका हे आपल्या आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांचे योगदान अमूल्य आहे. – तालुका आरोग्य अधिकारी
कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर निदान करणे अत्यंत गरजेचे आहे. – MOC कॅन्सर केअर तज्ज्ञ डॉक्टर महाड तालुक्यातील आशा सेविका आणि आरोग्य सेवक हे ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. या कार्यक्रमातून त्यांच्या कष्टांची दखल घेण्यात आली.

