रायगड लोकधारा वृत्त :
अविनाश जाधव वार्ताहर : कळंबोली:- दोन दिवस सुट्टी असल्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला मैत्राणीसह हरिहरेश्वर येथे सहलीसाठीआले होते. येथे रविवारी सकाळी हरिहरेश्वर येथे दगडावर बसून समुद्राच्या लाटांचा आनंद घेताना त्या उंच लाटेसोबत समुद्रात ओढल्या गेल्या. या मध्ये बुडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे यांचा मृत्यू झाला. पल्लवी सरोदे वय ३७ वर्ष या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक पदी कार्यरत होत्या. ह्या घटनेमुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात हळहळ व्यक्त करत आहेत. शनिवारी मंदिर परिसरात फिरून झाल्यानंतर सर्व महिला ह्या रविवारी दर्शन घेऊन त्या समुद्राकडे फिरत गेल्या होत्या. सर्व फेरफटका मारत असताना पल्लवी या एका दगडावर बसून पाण्याचा आनंद घेत समुद्राकडे पाहत बसल्या असताना मोठ्या लाट आली आणि त्यालाटेसोबत समुद्राकडे ओढल्या गेल्या आणि समुद्रात बुडाल्या. पल्लवी यांना दगडावर बसून सेल्फी घेण्याचा मोह झाला होता. महलानी त्यांना भरती असल्यामुळे आत येण्यास सांगत होत्या. तसेच काळजी घेण्यासाठी सांगत होत्या. त्यांनी मैत्रिणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ते पल्लवी याच्या जीवावर बेतले. महिलांनी आरडाओरड केली तेव्हा तेथेच मच्छिमारी करणारे अमर आणि अक्षय यांनी खवळलेल्या समुद्रात जाऊन त्यांचा शोध घेऊन पाच मिनिटं नंतर सापडल्या, परंतु पोटात पाणी गेल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
