रायगड लोकधारा वृत्त :
शिक्षणासाठी एक पाऊल पुढे….
पनवेल/ प्रतिनिधी : दिनांक 28/03/ 2025 रोजी हिंदुस्तान कोलास प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (तुर्भे) यांच्यातर्फे डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत स्मार्ट क्लास व ईको गाडीचे हस्तांतरण करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये हिंदुस्तान कोलास लिमिटेड कंपनी चे.श्री अद्वेश सिंग कुशवाह (रिजनल बिजनेस हेड),श्री. हरेंद्र सिंग (प्लांट मॅनेजर) श्री .दिगंबर कोहले(सीनियर साईट सर्विसेस ) , श्री. सुधाकर सानप ( प्लांट कमर्शियल) श्री. प्रदीप सिंग (प्लांट अकाउटंट), श्री. दिलीप परेरा (एच आर असिस्टंट ), डॉ.नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन चे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.श्री. नंदकुमार मारुती जाधव सर,संस्थेचे सचिव श्री. सुरेश जाधव सर, संस्थेचे खजिनदार श्री.अतुल वाणी सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.श्रेया जाधव मॅडम शाळेतील विद्यार्थी,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
हिंदुस्तान कोलास प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी वर्ग यांनी शाळेस भेट दिली. शाळेत चालणारे कामकाज पाहिले. सी. एस. आर प्रोजेक्ट अंतर्गत शाळेसाठी एक स्मार्ट क्लास यांच्यातर्फे बनवून देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत ने – आण करण्यासाठी इको गाडी शाळेला दिली. पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी बनवलेले पुष्पगुच्छ व व्यावसायिक वर्गातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू गिफ्ट बॅग मधून देण्यात आल्या. विदयार्थ्यांनी पाहुण्यांसमोर स्वागत गीत व नृत्य सादर केले. कंपनीचे रिजनल बिजनेस हेड श्री .अद्वेश सिंग कुशवाह व श्री. दिगंबर कोहले (इंजिनिअर साईट सर्विसेस) यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या कामकाजाचे कौतुक केले. व यापुढेही सहकार्य दिले जाईल असे आश्वासन दिले. आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर कार्यक्रम संपन्न झाला.



