रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्ताने खारघर ओवे सेक्टर १९ येथील मैदानावर दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या भव्य कार्यक्रमाला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपमहापौर प्रमिला पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, स्वप्निल ठाकूर, अपूर्व ठाकूर, यांच्यासह नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी लाखो भाविक उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाला सकाळपासूनच हजेरी लावली असून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. सकाळपासून गुरुबाणी, कीर्तन, पाठ आणि धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला. गुरुद्वाराच्या परंपरेनुसार लंगर सेवेचे आयोजन करण्यात आले असून हजारो स्वयंसेवकांनी सेवा कार्यात सहभाग घेतला आहे.


