रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ,पनवेल येथे २१ गरीब आणि गरजू महिलाना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. औचित्य होते पनवेल नवी मुंबई-पत्रकार संघाचे अध्यक्ष मयुर तांबडे यांच्या वाढदिवसाचे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक प्रथमेश सोमण, भाजपचे मा. सहसंयोजक-सांस्कृतिक सेलचे सुनील सिन्हा, सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे, पंडित मोहन जोशी, नगरसेवक सुमित झुंजारराव, भावना ग्रुपच्या अपर्णा शहा, सामाजिक कार्यकर्ते योगेश तांबोळी, हर्षला तांबोळी, डॉ. लक्ष्मीकांत निकम, शाहिद भाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेल्या वर्षी या पत्रकार संघाकडून आदिवासी आणि गरीब विद्यार्थ्यांना ३३ सायकलचे वाटप करण्यात आले होते. याचबरोबर शालेय साहित्य वह्यापेन, दप्तर आदींचेही वाटप केले आहे. सर्वच उपस्थित मान्यवरांनी मयूर तांबडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पनवेल-नवी मुंबई पत्रकार संघाचे कौतुक केले. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अध्यक्ष मयूर तांबडे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढची ६३ वर्ष वाढदिवस जल्लोषात साजरा करावा अशा शुभेच्छा दिल्या. मयुर तांबडे यांनी आपल्या परीने समाजाला काहीतरी देण्याचा नवा धडा आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, समाजाने प्रगती केली पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा आहे. समाजावर होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी पत्रकाराची भूमिका महत्त्वाची असते. पनवेल- नवी मुंबई पत्रकार संघातर्फे करण्यात येणारी समाजसेवा मयूर तांबडे हे सर्वांना सोबत घेऊन करत आहेत ते सर्वांसाठी अनुकरणीय असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. असे कार्यक्रम यापुढे देखील सातत्याने चालू राहावेत आणि संघटनेचे कार्य इतरांना प्रेरणा घेता याव्यात अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. भावना ग्रुपच्या अपर्णा शहा यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत पुढच्या वेळेला आम्ही देखील यात सहभागी होऊ असे आश्वासन दिले. डॉ. गिरीश गुणे यांनी देखील आपल्या भाषणात पनवेल- नवी मुंबई पत्रकार संघटनेचे आभार मानले आणि संघटना करत असलेल्या समाजसेवेबद्दल विशेष कौतुक केले.
यावेळी उपाध्यक्ष दिपक कांबळे, सचिव लालचंद यादव, खजिनदार मिलिंद खारपाटील, सदस्य रमेश भोळे, अशोक गोरडे, दीपक जगे, समीर वेश्विकर, पंकज तांबडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक पत्रकार उपस्थित होते. यावेळी कवी अशोक घरत यांनी कवितेचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मोहोकर यांनी केले.
