रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : नवीन पनवेलमध्ये भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांंचा १३४ वा जयंती महोत्सव (दि. १० एप्रिल ते १५ एप्रिल २५) भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, नवीन पनवेल. यांच्यावतीने प्रकाश बिनेदार, आम्रपाली बुध्द विहार, सेक्टर ०९, बिनेदार काॅर्नर जवळ, नवीन पनवेल व सिडको क्रिडांगण, बिनेदार मैदान, जय अंबेमाता मंदिरा शेजारी, शिवा काॅंम्पेक्स जवळ, सेक्टर ०२, नवीन पनवेल. या दोन्ही ठिकाणी साजरा होत आहे.
या जयंती महोत्सवा निमित्तानेआम्रपाली बुध्द विहार, सेक्टर ०९, बिनेदार काॅर्नर जवळ, नवीन पनवेल. या ठिकाणी १० एप्रिल ते १३ एप्रिल २५ दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच सोमवार दि.१४ एप्रिल २५ रोजी, सकाळी १०-०० ते १०-३० धम्म ध्वजारोहण व बुध्दवंदना बौध्दाचार्य अशोक मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर कल्पेश कांबळे (केंद्रीय शिक्षक भा. बौ. महासभा) यांचे जाहीर धम्म प्रवचन होऊन स्पर्धेंचा बक्षीस समारंभ झाल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्वाती बिनेदार आहेत.
त्याच दिवशी (१४ एप्रिल २५) सायंकाळी ६-०० वाजता, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे आणि पार्टी यांचा बुध्द-भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम सिडको क्रिडांगण, बिनेदार मैदान, सेक्टर ०२, (अंबेमाता मंदिरा शेजारी, शिवा काॅंम्पेक्स जवळ) नवीन पनवेल. या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष यश बिनेदार हे आहेत.
तसेच त्याच मैदानावर मंगळवार दि. १५ एप्रिल २५ रोजी, सायंकाळी ६-०० वाजता, महाराष्ट्राचे सुप्रसिध्द महागायक विशाल- साजन यांचाही बुध्द-भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्याम साळवी हे आहेत.
या कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक, कला-क्रिडा व राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करुन “भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार” देण्यात येणार आहे.
अशा या भरगच्च कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटावा. असे विनंतीपूर्वक आवाहन कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक अॅड. प्रकाश बिनेदार यांनी केले आहे.
