रायगड लोकधारा वृत्त :
कळंबोली वार्ताहर – अविनाश जाधव : कळंबोली वार्ताहर – एम एम आर डी ए चे शिवडी ते वरळी उन्नत मार्गाचे काम चालू आहे. त्यासाठी प्रभादेवी (एलफिस्टन) ब्रिज तोडण्याचे काम करण्यात येणार होते. यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी आंदोलने केली.
एलफिस्टन ब्रिज पाडण्याअगोदर तुम्ही स्थानिक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यावरती पहिले तोडगा काढावा. तुम्ही प्रथम स्थानिक लोकांचे पुनर्वसन करून त्या बिल्डिंग तोडून त्यानंतरच एलफिस्टन ब्रिज तोडण्यास घ्यावा. या ब्रिजवरून पूर्व साईडला केम हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल आहे यासाठी पश्चिमेकडून रहदारी करण्यासाठी ह्या ब्रिजचा वापर केला जातो आणि या शिवाय दुसरा मार्ग टिळक ब्रीज चा मार्ग दिला आहे त्या वर रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असल्यामुळे तेथे जाण्यासाठी भरपूर गर्दी होत आहे. त्यामुळे मनसेने सांगितले की हा एलफिस्टन ब्रिज बंद करण्या अगोदर पहिला समस्या सोडवा नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. एक साईडला शिवसेना ठाकरे गट तर दुसऱ्या साईला मनसे यांनी आंदोलन करून हा एलफिस्टन प्रभादेवी ब्रिज तोडण्यापासून थांबवण्यात आले होते.
