रायगड लोकधारा वृत्त :
मुंबई प्रतिनिधी – श्री.सतिश वि.पाटील : मुलुंड रेल्वेस्थानका शेजारी पूर्व/पश्चिम जोडणारा पादचारी पूल दुरूस्ती साठी 2023 मध्ये तोडला आजपर्यंत त्याचे काम ठप्प आहे .मुबंई पत्रकार: श्री.सतिश वि.पाटील ,आदर्श वार्ताहर संपादक:पंकज पाटील तसेच अनेक नागरिक व राजकीय पक्ष देखील यासंदर्भात मुलुंड रेल्वेस्थानकातील अधिकारी यांना प्रत्येक्ष भेटून कामासंदर्भात विचारविनिमय करण्यात आले. थोड्या दिवसात काम सुरू होणार म्हणून सांगण्यात आले आणि एक सीएसटी ऑफीसचा नंबर देण्यात आला पण तो नंबर उचलत नाहीत, मग जनतेची दिशाभूल केली जात आहे का मुलुंड मधील स्थानिक लोक प्रतीनीधी फक्त नावाला निवडून येतात का जनतेच्या समस्या व सुखसोई साठी निवडून दिले का फक्त अमुकतमुक मोठमोठे बॅनर बाजी करताना ,नारळ फोडण्याचे फोटो शुट करण्याचे महान कार्य चालू आहे ,प्रत्येक्षात अनेक मुलुंड मधील कामासंदर्भात फक्त अक्षदा लावण्याचे काम चालू आहे.
आजपर्यंत अनेक लोक रेल्वेस्थानकातील रेल्वे ब्रीज वापर करत आहेत रेल्वेकडून असे सांगण्यात येत आहे जर प्लॅटफॉर्म टिकीट नसेल तर आधारकार्ड दाखवा ते नसल्यास दंड वसूल केला जातो हा भुर्दंड का ? जनतेला वेठीस धरण्याचे काम चालू आहे.खरतर रेल्वे प्रशासन यांची हलगर्जी चालू असताना जनतेकडून दंड वसूली चुकीची आहे , अनेक लोकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.तरी रेल्वे प्रशासन व एमआरवीसी तर्फे चार पुलाचे काम 2025 मध्ये पुर्ण करण्यात येत आहे अशी अधिकृत माहीती देण्यात आली.पण चार पुलाचे काम होण्यास आजून विलंब लागेल असे रेल्वे प्रशासनाकडून बोलण्यात आले आहे.तरी जनतेची गैरसोय लक्षात घेता पुलाचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन जनतेला दिलासा द्यावा अशी अशी मागणी सर्व स्थरांतून होत आहे.तसेच मुलुंड पूर्व/ पश्चिमेला जाण्यासाठी वाहनासाठी देखील पर्याय अनेक वर्ष प्रलंबित आहे .जे दोन पर्यायी रस्ते आहेत ते बरेच लांब आहेत मुलुंड मध्यस्थाची पूर्वीपासून अपनाबाजार ब्रिज येथे फाटक मार्ग होता तो बंद करून अनेक वर्ष उलटून देखील मुलुंड पूर्व/पश्चिमेला जोड रस्ता बनवला नाही अनेक डीपी तयार केले पण प्रत्येक्षात काम झालेच नाही.मुलुंडकर याची देखील मागणी रेल्वे कडे अनेक वर्ष करीत आहे.तरी या गैरसोय बाबत दखल घेऊन लवकरात लवकर पर्यायी मार्ग काढण्यात यावा अशी सर्व नागरिकांकडून मागणी आहे .


