रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : मंत्री महोदय मा. भरतशेठ गोगावले साहेब रोजगार हमी योजना व फलोत्पादन खार भूमी विकास यांचे आदेशान्वये महाड तालुक्यातील प्रमुख गावामध्ये मनरेगा “रोजगार हमी योजना रथ” जनजागृती करण्यासाठी यांनी सूचनेनुसार तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी महाड यांच्या वतीने रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी व जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ विन्हेरे येथून करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.जि प. सदस्य निलेशजी ताठरे साहेब प्रमुख उपस्थिती ,मा. जि.प निकिताताई ताठरे , मा. सभापती सिताराम दादा कदम ट्रस्ट अध्यक्ष महेश महाडीक व सरपंच आनंत म्हाप्रळकर व उपसरपंच चंद्रकांत मोरे गावातील प्रमुख पदाधिकारी, मंत्री महोदय स्वीय सहाय्यक राजेश जाधव,उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खटकाळे साहेब, गटविकास अधिकारी डाॅ स्मिता पाटील,तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे साहेब,मंडळ कृषि अधिकारी,महाड भरत कदम स्वीय सहाय्यक मनोज जाधव, कृषी अधिकारी सुनील जाधव पंचक्रोशीतील सर्व सरपंच शेतकरी वर्ग कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, ग्रामसेवक उपस्थित होते.
विन्हेरे येथील जागृत देवस्थान श्री देवी झोलाई माता मंदिरापासुन रोजगार हमी रथाची फीत कापून व नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्तावना किरण कोकरे कृषि पर्यवेक्षक यांनी केली. उपस्थित शेतकरी वर्गास मार्गदर्शन करतेवेळी स्वीय सहाय्यक मनोज जाधव यांनी मार्गदर्शन करतेवेळी पडीक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून दोन हेक्टर च्या आतील शेतकऱ्यांनी बांबू लागवड, फळबाग लागवड, गुरांचा गोठा, कुक्कुटपालन, शेळीपालन शेड सिंचन विहीर, इत्यादी वैयक्तिक कामे घेऊन मी समृद्ध तर समृद्ध गाव होईल. प्रत्येक कुटुंब लखपती होण्याकरिता आपण वैयक्तिक योगदानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. योजना प्रभावी अंमलबजावणी करणे करिता सर्व यंत्रणेने योगदान देणे आवश्यक आहे. जॉब कार्ड काढणे, लाभार्थी निवड, ग्रामसभेचा ठराव ही कामे महिना अखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. महाड तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये रोजगार हमी योजना रथ व गाव बैठका घेऊन जनजागृती कार्यक्रम करणार असल्याचे मत उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खटकाळे यांनी सांगितले.
जॉब कार्ड मोहीम स्वरूपात ग्राम अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे मत गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार तानाजी जगदाळे कृषी पर्यवेक्षक,नागाव यांनी केले. यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यक उदय लेंगरे व सुरेश बोडके यांनी केले.
